किल्ले रायगडावर शिवसमाधीसमोर पुस्तक पूजन करताना दोघांना अटक | पुढारी

किल्ले रायगडावर शिवसमाधीसमोर पुस्तक पूजन करताना दोघांना अटक

अलिबाग : पुढारी वृत्तसेवा

किल्ले रायगडवर धक्कादायक असा प्रकार घडला आहे. शिवसमाधीसमोर राख आणून पुस्तक पूजन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर दोघांना ताब्यात घेण्यात आले होते. महाड तालुका पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बुधवारी दुपारी शिवसमाधीसमोर पुस्तक पूजन सुरू असल्याचे गडावरील शिवप्रेमींना दिसून आले. यानंतर जेव्हा अधिक माहिती घेतली असता त्यांच्याकडे डब्यात राख असल्याचेही देखील आढळले. त्यानंतर शिवप्रेमींनी संताप व्यक्त करत पोलिसांना माहिती दिली. त्यांनंतर पोलिसांनी कारवाई करत राख आणि पुस्तक जप्त केले.

डब्यातील राखेची लॅबमध्ये चाचणी केली जाणार असल्याची माहिती समजत आहे. दरम्यान, दोघांची नावे समजू शकलेली नाहीत. तसेच नेमके पुस्तक कोणते आणि ते दोघे काय करत होते याबाबतची जादाची माहिती समोर आली नाही. या प्रकरणाची नोंद महाड तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या अहवालानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे.

Back to top button