ही तर माझ्यासाठी तीर्थयात्रा ; रायगड भेटीनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद आनंदित - पुढारी

ही तर माझ्यासाठी तीर्थयात्रा ; रायगड भेटीनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद आनंदित

रायगड; पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज सोमवार (दि. ६) रोजी रायगड किल्ल्याला भेट देवून छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली वाहिली. यावेळी झालेल्या अभिभाषणात  ही तर माझ्यासाठी तीर्थयात्रा असून मला आनंद झाल्याचे म्हटले आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सविता कोविंद, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, खासदार संभाजीराजे छत्रपती आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी आयोजित प्रदर्शनाला राष्ट्रपतींनी भेट देऊन दोन पुस्तकांचे प्रकाशनही केले. राष्ट्रपती रामनाथ गोविंद यांनी गडावर आधारित माहितीपटाचे प्रकाशनही केले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गडावर आल्यानंतर प्रथम होळीच्या माळरान येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर राजसदरेवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन केले. राजसदरेवर राष्ट्रपती कोविंद यांनी अभिभाषण केले.

त्यानंतर समाधी स्थळावर आपल्या कुटूंबासह जाऊन ते नतमस्तक झाले. यावेळी रायगड प्राधिकरण विकास मार्फत सुरू असलेल्या कामाची पाहणी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केली. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रपती यांना तलवार भेट दिली.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या अभिभाषणात म्हणाले की, विसाव्या शतकात गांधीजींनी स्थापन केलेले हिंद स्वराज्य हे छत्रपती शिवाजी महाराज (shivaji maharaj) यांच्या हिंदवी स्वराज्यापासून प्रेरित झाले आहे. किल्ले रायगडाला भेट देणे हे प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. आज किल्ले रायगडाची केलेली यात्रा  मी तीर्थक्षेत्र मानतो (ही तर माझ्यासाठी तीर्थयात्रा ) किल्ले रायगडावर येऊन मला खूप आनंद झाला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे आभार मानतो कारण मला त्ायंनी मला येथे येण्यासाठी निमंत्रित केले होते. असे ते यावेळी म्हणाले.

हेही वाचलंत का? 

Back to top button