पाली : पुढारी वृत्तसेवा : पाली खोपोली महामार्गावर दापोडे जवळ मांढरे पेट्रोल पंप समोर भंगार व जुन्या लाकडाच्या गोदामाला मंगळवारी दुपारी अडीच्या दरम्यान वणव्यामुळे लागली असून दोन्ही गोदामातील सामान जळून खाक झाले आहे.
संबंधित बातम्या
भंगार गोदाम हे कृशित खान व जुन्या लाकडाचं गोदाम शंभू गुप्ता यांच्या मालकीचे होते. लागलेल्या वणव्यामुले त्यांचे नुकसान झाले आहे. दुपारी अडीच्या दरम्यान ही भीषण आग लागली. त्यांनतर नगरसेवक सुलतान बेनसेकर यांना ही घटना समजताच त्यांनी घटनास्थळी येऊन तात्काळ आमडोशी सुप्रीम पेट्रोकेम कंपनीची व रिलायन्स नागोठणे येथील अग्निशमन दलाच्या गाड्या बोलावून पाली पोलिसांना कळवले. तात्काळ पाली पोलीस घटनास्थळी पोहचले.
तत्पूर्वी स्पीड इंटरप्राईजेसच्या पाण्याच्या टँकरने आग विजवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. त्यांनी लागलेली आग विजवली. मात्र हा वणवा कसा लागला हे अद्याप स्पष्ट झाले नाही.