रायगड : स्वच्छतेची शपथ घेत मध्य रेल्वेवर स्वच्छता पंधरवडयाला सुरुवात | पुढारी

रायगड : स्वच्छतेची शपथ घेत मध्य रेल्वेवर स्वच्छता पंधरवडयाला सुरुवात

रोहे ; पुढारी वृत्तसेवा : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी यांनी मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्रधान विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. १६ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबरपर्यंत संपूर्ण रेल्वेमध्ये स्वच्छता पंधरवडा साजरा  करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याद्वारे स्थानके, रेल्वे, कार्यालये, वसाहती, कार्यशाळा, देखभाल डेपो, रुग्णालये इत्यादींमध्ये स्वच्छतेमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेचे मुख्यालय आणि सर्व विभागातील रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेसाठी वर्षातून १०० तास, म्हणजे आठवड्यातून दोन तास स्वच्छतेसाठी समर्पित करावे. स्वच्छतेसाठी स्वेच्छेने काम करावे, एकेरी वापराच्या प्लास्टिकविरोधात जनजागृती करून स्वच्छतेसाठी आपली बांधिलकी दाखवावी, स्वत:, कुटुंब, परिसर, गाव आणि कामाच्या ठिकाणी स्वच्छतेसाठी वचनबद्धता सुनिश्चित करण्याची प्रतिज्ञा यावेळी सर्व अधिकाऱ्यांनी केली आहे.

प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यासाठी विविध कार्यालये, युनिट्स आणि डेपोमध्ये श्रमदान आणि वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर स्वयंसेवी संस्था आणि सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. पर्यावरण व स्वच्छता प्रकल्पाबाबत विविध नावीन्यपूर्ण कामे सुरू करण्यात आली.

स्वच्छता पंधरवडा अंतर्गत प्रत्येक दिवशी स्वच्छता उपक्रमासाठी स्वतंत्र जागा निश्चित करण्यात आली असून, तेथे स्वच्छतेची शपथ घेतली जाईल. विविध कार्यक्रमात १६ सप्टेंबर रोजी स्वच्छता जागरूकता,१७ सप्टेंबर रोजी स्वच्छ संवाद (स्वच्छता संवाद/सार्वजनिक), १८ सप्टेंबर रोजी स्वच्छ स्टेशन (स्वच्छ स्टेशन) प्रमुख स्टेशन, १९ सप्टेंबर रोजी प्रमुख स्थानकांव्यतिरिक्त स्वच्छ स्थानके, २० सप्टेंबर रोजी स्वच्छ ट्रेन कार्यक्रम होणार आहे.

तर २१ सप्टेंबर रोजी स्वच्छ ट्रेन, २२ सप्टेंबर रोजी स्वच्छ ट्रॅक, २३ सप्टेंबर रोजी स्वच्छ कार्यालये, स्वच्छ वसाहती आणि परिसर, २४ सप्टेंबर रोजी स्वच्छ खाणे, २५ सप्टेंबर रोजी स्वच्छ खाणे, २६ सप्टेंबर रोजी स्वच्छ नीर (स्वच्छ पाणी), २७ सप्टेंबर स्वच्छ जलाशय आणि उद्यान, २८ सप्टेंबर रोजी स्वच्छ शौचालये आणि पर्यावरण, २९ सप्टेंबर रोजी स्वच्छ स्पर्धा, ३० सप्टेंबर रोजी सिंगल युज प्लास्टिकला नकार म्हणा, १ ऑक्टोबर रोजी आढावा/संक्षिप्त आणि स्वच्छ जनजागृती रॅली, २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती आणि सामुदायिक दिन/सेवा दिवस/सामुदायिक सहभाग आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

स्वच्छता पंधरवड्यादरम्यान स्पर्धा आणि जनजागृती रॅलीही काढण्यात येणार असून ‘प्लास्टिकला नको’ हा संदेश देण्यात येणार आहे. २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त विविध उपक्रमांनी स्वच्छता पंधरवड्याची सांगता होणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button