पनवेल: काळुंद्रे येथे पोलिसांच्या हाताला झटका देऊन आरोपीचे बेडीसह पलायन | पुढारी

पनवेल: काळुंद्रे येथे पोलिसांच्या हाताला झटका देऊन आरोपीचे बेडीसह पलायन

पनवेल: पुढारी वृत्तसेवा: नालासोपारा पोलिसांच्या ताब्यातील आरोपीला पुणे येथील पर्वती पोलीस स्टेशनला घेऊन जाताना आरोपी पनवेलमध्ये पोलिसांच्या तावडीतून फरार झाला. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

सागर प्रकाश गुरव (वय २२, रा. जाधव रेसिडेन्सी, नालासोपारा, पूर्व मूळ शिगवण वाडी, ससाले, राजापूर रत्नागिरी) असे आरोपीचे नाव आहे. पर्वती पुणे पोलीस स्टेशनमध्ये सागर प्रकाश गुरव याच्याविरोधात पोस्को  तसेच अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला काही दिवसांपूर्वी नालासोपारा येथून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याला नालासोपाराहून पर्वती पोलीस स्टेशन पुणे येथे पोलीस घेऊन जात होते.

यावेळी आरोपीला बाथरूमसाठी काळुंद्रे येथील एका धाब्यावर थांबवले असता, त्याने पोलिसांच्या हाताला झटका बेडीसकट काळुंद्रेच्या दिशेने पळून गेला. या आरोपीचा पोलिसांनी पाठलाग केला. मात्र, आरोपी सापडून आला नाही. त्यामुळे पनवेल शहर पोलीस ठाण्यात कलम २२४ नुसार सागर गुरव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा 

Back to top button