रायगड: रोहात मुसळधार पाऊस, नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले | पुढारी

रायगड: रोहात मुसळधार पाऊस, नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले

पुढारी वृत्तसेवा: भारतीय हवामान खात्याने आज (१९ जुलै) पालघर, रायगड या दोन्ही जिल्ह्यांना ‘रेड’ अलर्ट जारी करण्यात आला होता. यानुसार रायगड आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. यामुळे येथील कुंडलिका नदी तुटुंब भरून वाहू लागली आहे.
डोंगर माथ्यावरून भरून येणाऱ्या नदी नाल्यामुळे कुंडलिका नदीत तुडुंब भरून दुथडी वाहू लागले आहे. मोठ्या प्रमाणात कुंडलिकेच्या पात्रात पाणी आले आहे. रोहा अष्टमी शहराला जोडणारा जुना पूल वाहतुकीस बंद करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण वाहतूक ही नव्या पुलावरून वळविण्यात आले आहे.

कुंडलिका नदीत दुथडी भरून वाहत आहे. सातत्याने कुंडलिका नदीच्या पात्रात पाणी वाढत आहे त्यामुळे नगरपालिकेने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कच्या इशारा दिला असून सकाळी दहाच्या सुमारास नगरपालिकेने सायरन वाजवले आहे. मुसळधार पावसामुळे संपूर्णपणे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाऊस सातत्याने मुसळधार पडत असल्याने रोह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आले आहे. सुरक्षतेच्या कारणावरून रोहा अष्टमी पुलावर पोलीस तैनात करण्यात आले आहेत

Back to top button