गणेशोत्सवापूर्वी मुंबई- गोवा महामार्गावरील एक मार्गिका पूर्ण करा : मंत्री रविंद्र चव्हाण

गणेशोत्सवापूर्वी मुंबई- गोवा महामार्गावरील एक मार्गिका पूर्ण करा : मंत्री रविंद्र चव्हाण

पोलादपूर; पुढारी वृत्तसेवा: मुंबई – गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आमदार आणि अधिकारी यांच्या समवेत आज (दि.१४) केली. महामार्गाचे काम मागील १४ वर्षांपासून रखडलेल्या अवस्थेत आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. यावर मंत्री चव्हाण यांनी अधिकारी वर्गाची खरडपट्टी काढली. गणेशोत्सवापूर्वी महामार्गावरील एक मार्गिका पूर्ण करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

नरवीर रेस्क्यू टीमचे रामदास कळंबे, सचिन मेहता, दीपक उतेकर यांनी पोलादपूरसह आसपासच्या विद्यार्थींसाठी पादचारी पुलाची मागणी केली. तसेच ग्रामीण रुग्णालयाकडे जाण्यासाठी सर्व्हिस रस्त्याची मागणी केली. यावर मंत्री चव्हाण यांनी दोन्ही कामे मार्गी लावावीत. अशा सूचना दिल्या. यावेळी उपस्थित अधिकारी यांनी या कामांच्या निविदा प्रकिया पूर्ण झाली असल्याची माहिती दिली. मंत्री चव्हाण यांनी कशेडी घाटाची पाहणी करत गणपती पूर्वी एक मार्गिका सुरू करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर ते भोगदामार्गे रत्नागिरी जिल्ह्याकडे रवाना झाले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news