३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला येणार साडेतीन लाख शिवभक्त | पुढारी

३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला येणार साडेतीन लाख शिवभक्त

महाड; श्रीकृष्ण द. बाळ :  किल्ले रायगडावर तारखेनुसार होणाऱ्या ६ जूनच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमाची तयारी आता अंतिम टप्प्यात पोचली आहे. यासाठी संपूर्ण भारत देशातून या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी साडेतीन लाख शिवभक्त किल्ले रायगडावर येतील. शिवराज्याभिषेक समितीमार्फत ४० समित्यांच्या नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी दिली आहे.

शासनाकडून २ जून रोजी तिथीनुसार संपन्न झालेल्या कार्यक्रमात राजदरबारात उभारण्यात आलेल्या दरबारातील सजावटीसंदर्भात असलेल्या त्रुटी लक्षात घेऊन राजसदरेवरील करण्यात आलेले काम हटविण्यात आले असून राजसदरेवरील पूर्वीची असलेली भिंत त्याच पद्धतीने ठेवण्याची सूचना रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी केल्यानंतर राज्य दरबारातील असलेल्या या सजावटीमध्ये अमुलाग्र बदल करण्याची कामे युद्ध पातळीवर सुरू झाली असून आगामी दोन दिवसात पावसाची शक्यता लक्षात घेऊन संपूर्ण राज दरबार हा वॉटरप्रूफ करण्याबाबतची प्रक्रिया सुरू झाल्या आहेत.

या संदर्भात प्राप्त झालेल्या विश्वसनीय माहितीनुसार राजदरबारातील २ जून रोजी करण्यात आलेली सजावटीची बहुतांश कामे दूर करण्यात आली असून ऐतिहासिक पद्धतीची जुनी असणाऱ्या वस्तू शिवभक्तांसमोर राहाव्यात व ऐतिहासिक पद्धतीनेच हा कार्यक्रम शामियानामध्ये संपन्न व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

किल्ले रायगडावर उद्या होणाऱ्या तारखेनुसार ६ जूनच्या कार्यक्रमाची तयारी आता अंतिम टप्प्यात पोचली असून यासाठी संपूर्ण भारत देशातून या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी साडेतीन लाख शिवभक्त किल्ले रायगडावर येतील अशी माहिती शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांच्यामार्फत प्राप्त झाली आहे. किल्ल्यावर येणाऱ्या या लाखो शिवभक्तांसाठी समितीमार्फत ४० समित्यांची विविध विभाग निहाय स्थापना करण्यात आली असून यामध्ये सुमारे २७०० सदस्य गेल्या तीन दिवसापासून कार्यरत असल्याची माहिती सावंत यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

या समित्यांमध्ये अन्नपाणी व नाश्त्याची व्यवस्था समितीमार्फत करण्यात येणार असून नियंत्रण पाणी आरोग्य या संदर्भात स्वतंत्र पद्धतीने सदस्यांच्या नेमणुका करण्यात आली असून कोण जर येथील पार्किंग स्टेशनपासून समित्यांमधील सदस्य शिवभक्तांसाठी सर्वतो परी सहकार्य करण्यास सज्ज होणार आहेत.

या सोहळ्यासंदर्भात प्राप्त झालेल्या माहितीनुसार पाच व सहा जून रोजी दोन दिवस शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये हा कार्यक्रम तारखेनुसार संपन्न होणार असून या सोहळ्याकामी छत्रपती संभाजी राजे, युवराज शहाजीराजे यांसह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. समितीमार्फत ४० समित्यांच्या नियुक्ती करण्यात आली आहे. पावसाची शक्यता लक्षात घेऊन शिवभक्तांची काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

Back to top button