रायगड किल्ल्यावर मुसळधार पाऊस | पुढारी

रायगड किल्ल्यावर मुसळधार पाऊस

नाते; पुढारी वृत्तसेवा: महाड शहरासह किल्ले रायगड परिसरात आज (दि.४) दुपारी जोरदार पाऊस झाला. किल्ले रायगडावर काळे ढग दाटून आल्याने पूर्ण काळोख निर्माण झाला होता. दरम्यान, मुसळधार पावसामुळे गडावरील पाण्याची भीषण टंचाई दूर होण्यास मदत होईल, असा विश्वास गडावर उपस्थित शिवभक्तांनी व्यक्त केला.

मंगळवारी (दि. ६) किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येणार आहे. सोहळ्याची अंतिम तयारी सुरू आहे. परंतु, मुसळधार पावसामुळे तयारीत व्यत्यय आला.  स्थानिक प्रशासन व समिती तयारीच्या कामात व्यस्त आहे. परंतु, पावसामुळे सर्वांची तारांबळ उडाली.

हेही वाचा 

Back to top button