Newali Malanggad rescue : घनदाट जंगलात तीन दिवसांचा थरार; अखेर सफिया सुखरूप बाहेर!

मलंगगडाच्या दाट जंगलात भरकटलेल्या ५५ वर्षीय महिलेची केली सुटका
Newali Malanggad rescue
Newali Malanggad rescuepudhari photo
Published on
Updated on

नेवाळी : किल्ले श्री मलंगगड परिसरातील घनदाट जंगल, दाट झाडी आणि कड्यांच्या दुर्गम भागात तीन दिवस अडकलेल्या ५५ वर्षीय सफिया यांची अखेर बुधवारी सुखरूप सुटका करण्यात आली. हिललाईन पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक आदिवासी तरुण आणि पोलिस मित्रांनी राबविलेल्या शर्थीच्या शोधमोहीमेला अखेर यश आले. बचावानंतर सफिया यांना पुढील उपचारासाठी उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सफिया या छत्रपती संभाजीनगर येथून रविवारी श्री मलंगगडावर दर्शनासाठी आल्या होत्या. दर्शनानंतर परिसरातील पायवाटेचा अंदाज न आल्याने त्या घसरून कड्यालगतच्या घनदाट जंगलात जाऊन अडकल्या. दुर्गम आणि धोकादायक परिसरामुळे त्यांना शोधून बाहेर काढणे बचाव पथकासाठी मोठे आव्हान होते.

Newali Malanggad rescue
Bhiwandi crime : अघोरी उपचारांच्या नावाखाली महिलेवर अत्याचार

महिला जंगलात अडकल्याची माहिती मिळताच स्थानिक आदिवासी तरुण आणि पोलिस मित्रांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. अवघड वाटा, दाट झाडी आणि कड्यांचा भाग असल्याने प्रत्येक पाऊल सावधपणे टाकत शोध घेण्यात आला. अखेर बुधवारी दुपारी बचाव पथकाला सफिया यांचा ठावठिकाणा लागला. त्यानंतर त्यांना सुरक्षितपणे जंगलाबाहेर आणण्यात आले.

बचावानंतर प्रकृतीची तपासणी करून त्यांना तातडीने मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. या बचावकार्यात स्थानिक आदिवासी तरुणांची तत्परता आणि पोलिस मित्र विष्णु पुजारी यांचे योगदान महत्त्वाचे ठरले.

Newali Malanggad rescue
Stray dogs at crematorium : डोंबिवली कुंभारखानपाडा स्मशानभूमीवर भटक्या श्‍वानांचा कब्जा

धोकादायक ठिकाणी ‘फोटो’चा मोह जीवावर बेतू शकतो!

मलंगगडावर निसर्ग पर्यटन आणि देवदर्शनासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. मात्र काही जण उंच कडे, खोल दरी आणि अन्य धोकादायक ठिकाणी जाऊन फोटो-व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करतात. प्रशासन आणि स्थानिकांकडून वारंवार सूचना करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पर्यटकांनी सुरक्षेला प्राधान्य देत धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन स्थानिक ओमकार पावशे यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news