आरटीई प्रवेशासाठी जागा एक लाख, अर्ज साडेतीन लाख | पुढारी

आरटीई प्रवेशासाठी जागा एक लाख, अर्ज साडेतीन लाख

रायगड; सुयोग आंग्रे :  शिक्षण हक्क (आरटीई) कायद्यांतर्गत शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या २५ टक्के प्रवेशांसाठी पालकांना अर्ज करण्यास २५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. अंतिम मुदतीनंतर राज्यात ३ लाख ६३ हजार ८०५ पालकांनी अर्ज सादर केले आहेत. राज्यातील ८ हजार ८२८ शाळांमध्ये आरटीई प्रवेशासाठी १ लाख १ हजार ९६९ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. या जागांमध्ये प्रवेश निश्चित व्हावा यासाठी पालकांनी केलेल्या अर्जाची संख्या जागांच्या संख्येच्या तिपटीन असल्याने शिक्षण विभागाला अर्जांची छाननी डोळ्यात तेल टाकून करावी लागणार आहे. छाननी प्रक्रियेत बाद होणारे आणि नियमात बसणाऱ्या तब्बल अडीच लाख विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा येणार आहे.

आरक्षित जागा १ लाख १ हजार ९६९

आरटीई प्रवेशासाठी यंदा राज्यातील शाळांमध्ये १ लाख १ हजार ९६९ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. यामध्ये रायगड ४२५६, अहमदनगर २८२५, अकोला १९४६, अमरावती २३०५, औरंगाबाद ४०७३, भंडारा ७६३, बीड १८२७, बुलढाणा २२४६, चंद्रपूर १५०३, धुळे १००६, गडचिरोली ४६२, गोंदिया ८६४, हिंगोली ५३९, जळगाव ३१२२, जालना २२७३, कोल्हापूर ३२७०, लातूर १६६९, मुंबई ६५६९, नागपूर ६५७७, नांदेड २२५१, नंदूरबार ३४०, नाशिक ४८५४, धाराशिव ८७७ पालघर ५४८३, परभणी १०५६ पुणे १५६५५, रत्नागिरी ९२९, सांगली १८८६, सातारा १८२१, सिंधुदुर्ग २८७, सोलापूर २३२०, ठाणे १२२७८, वर्धा ११११, वाशीम ७८६ आणि यवतमाळ जिल्ह्यात १९४० जागांचा समावेश आहे.

३ लाख ६३ हजार ८०५ अर्ज

राज्यात ३ लाख ६३ हजार ८०५ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये रायगड १०४७१, अहमदनगर ९७४४, अकोला ७०६३, अमरावती ९३४५, औरंगाबाद २०७१९, भंडारा ३१६०, बीड ७६५८, बुलढाणा ७०४७, चंद्रपूर ४८३२, धुळे ३७२४, गडचिरोली १३७४, गोंदिया ३९४५, हिंगोली २७०४, जळगाव ११२३७, जालना ७२८९, कोल्हापूर ४९२२, लातूर ७४२३, मुंबई १८२९९, नागपूर ३६४९९, नांदेड ११११९, नंदूरबार १२५०, नाशिक २१९४१, धाराशिव २९१९, पालघर ४६११, परभणी ३७९४, पुणे ७७३९०, रत्नागिरी १०९३ सांगली ३१२०, सातारा ४४८९, सिंधुदुर्ग २२३, सोलापूर ७६७३, ठाणे ३१५४१, वर्धा ४९७७, वाशीम २७४७ आणि यवतमाळ जिल्ह्यात ७४६३ पालकांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.

Back to top button