रायगड जिल्ह्यात ‘येलो अलर्ट’ .. जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता | पुढारी

रायगड जिल्ह्यात 'येलो अलर्ट' .. जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता

अलिबाग; पुढारी वृत्तसेवा :  भारतीय हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक विभागाने रायगड जिल्ह्यात १५ आणि १६ मार्च या दोन दिवसांसाठी पावसाचा ‘येलो अलर्ट’ जाहीर केला आहे. त्यामुळे बुधवारी जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. हवामान विभागाने हलक्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आंबा बागायतदारासह शेतकरी पुन्हा चिंतेत सापडला आहे.

अवकाळी पावसाचा अंदाज आएमडीनी वर्तवला आहे. कोकणासह रायगड जिल्ह्यातही पावसाचा येलो अलर्ट जाहीर केले आहे. १५ आणि १६ मार्च या दोन दिवस हा अलर्ट आहे. त्यामुळे जिल्ह्यात ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहून हलक्या पावसाच्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे बुधवारी दिवसभर जिल्ह्याच्या अनेक भागात ढगाळ वातावरण राहून सूर्य दर्शन झाले नाही.
रायगड जिल्ह्यातील आंबा, पांढरा कांदा, वाल, कलिंगड यासह भाजीपाल्यांच्या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकणातील वातावरणात उष्णता वाढणार असून पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मागच्या आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावल्यामुळं शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. त्यामुळं आता पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळं शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे..

हिमालयात होणारी बर्फवृष्टी आणि उत्तरेकडून येणाऱ्या वादळी वाऱ्यांमुळं महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल झाला आहे. मार्च महिन्याचा दुसरा आठवडा संपत आ- लेला असताना अद्याप अपेक्षित उन्हाची चाहूल लागलेली नाही. त्यातच आता अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळं रब्बी पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यात बराच काळ सूर्य दर्श होऊ शकले नाही.

Back to top button