मुंबई कस्टम झोनची धडक कारवाई, ५३८ कोटींचे ड्रग्ज केले नष्ट | पुढारी

मुंबई कस्टम झोनची धडक कारवाई, ५३८ कोटींचे ड्रग्ज केले नष्ट

पनवेल, पुढारी वृत्‍तसेवा : मुंबई कस्टम झोन- ३ तर्फे विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये गेल्या वर्षभरात जवळपास ५३८ कोटी रुपये किंमतीचे १४०.५७ किलो ड्रग्ज पनवेल जवळील तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड फॅसिलीट याठिकाणी नष्ट करण्यात आले.

देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारुन मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करून ते एकत्रीत साठवले जातात. त्यानंतर साठवलेले हे अंमली पदार्थ उच्च अधिकाऱ्यांच्या परवानगीने डिस्पोजल कमिटीच्या समक्ष जाळून नष्ट करण्याची कारवाई केली जाते. याअंतर्गत मुंबई कस्टम झोन- ३ तर्फे गेल्या वर्षभरात जप्त केलेले ५३८ कोटी रुपये किमतीचे १४०.५७ किलो ड्रग्ज तळोजातील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड फॅसिलीट याठिकाणी नष्ट करण्यात आले. यामध्ये मुंबई विमानतळ आयुक्तालयाने 14 प्रकरणांमध्ये जप्त केलेले 56.06 किलो हेरॉईन आणि 33.81 किलो चरस, एअर कार्गो निर्यात आयुक्तालयाने गुन्ह्यात जप्त केलेले २१.७० किलो चरस, तर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) ने एका प्रकरणात जप्त केलेले 29 किलो हेरॉईन यांचा समावेश आहे.

या कारवाईवेळी मुंबई कस्टम्सचे प्रधान आयुक्त राजेश सॅनन यांच्यासह आणि ड्रग्ज नष्ट करण्याच्या ऑपरेशनचे प्रभारी अधिकारी यांच्या उपस्थित होते. यावेळी राजेश सॅनन यांनी सांगितले कि, ड्रग्सची तस्करी हि प्रामुख्याने केनिया, युगांडा, झांबिया आणि झिम्बाब्वे या देशांतील नागरिकांकडून केली जाते. बॅगेजमध्ये बनविलेल्या खास खोट्या पोकळ्यांमध्ये औषधे लपवून अंमली पदार्थांची तस्करी केली जाते. मुंबई विमानतळ कस्टम्सने या केसेस शोधण्यासाठी स्निफर डॉगचा प्रभावीपणे वापर केला आहे.

हेही वाचा  

Back to top button