Khopoli Ganja Seizure : खोपोलीत 1 लाखांचा चार किलो गांजा जप्त

आई, मुलगा अटकेत, परिसरात खळबळ
Khopoli Ganja Seizure
खोपोलीत 1 लाखांचा चार किलो गांजा जप्तpudhari photo
Published on
Updated on

खोपोली ः खोपोली शहरात माय-लेक मिळून गांजा विक्रीचा व्यवसाय चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी टाकलेल्या धाडीत चार किलो गांजा, मोबाईल फोन आणि विक्रीसाठी लागणारे साहित्य असा सुमारे 1 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत दोघांना अटक केली आहे.

नवनाथ कॉलनी, पटेलनगर शिळफाटा परिसरात अमली पदार्थांची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार 19 मे रोजी दुपारी पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला. यावेळी शमीम हनू शेख (वय 56) आणि तिचा मुलगा सलमान हनू शेख (वय 34) या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले.

Khopoli Ganja Seizure
Buldhana Crime News : 'चिल्ड्रेन बँक'च्या नोटांनी फसवणूक करणारी टोळी जेरबंद; पोलिसांवर चाकू हल्ला

पोलिसांनी केलेल्या झडतीत पारदर्शक प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून ठेवलेला चार किलो वजनाचा गांजा आढळून आला. बाजारमूल्यानुसार या गांजाची किंमत सुमारे 1 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. तसेच गांजा पॅकिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या पिशव्या, दोन मोबाईल फोन व अन्य साहित्यही जप्त करण्यात आले.

या प्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक डॉ. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली पोलीस करत आहेत.

Khopoli Ganja Seizure
Beed Crime News | अंबाजोगाईत हॉटेलवर पोलिसांचा छापा; 'तिर्रट' जुगाराचा डाव उधळला, ६ जणांना अटक

मायलेकांचा सामुहिक धंदा

विशेष म्हणजे आरोपी माय -लेक स्वतःच्या राहत्या घरातूनच गांजा विक्रीचे जाळे चालवत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. परिसरातील तरुणांना अमली पदार्थ पुरवले जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या रॅकेटमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news