

उरण; पुढारी वृत्तसेवा : जेएनपीटी बंदरातून होणार्या आयात निर्यातीच्या माध्यमातून बेकायदा तस्करीचे प्रकार
यापूर्वी अनेकदा उघडकीस आले आहेत. आता पुन्हा एकदा घरगुती सामानाच्या कंटेनरमधून प्राण्यांची कातडी आणि प्रसिद्ध चित्रकारांची कोट्यवधींची दुर्मिळ चित्रे हस्तगत करण्यात आली आहेत.
जेएनपीए बंदरात तस्करीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.मात्र याकडे सीमाशुल्क विभागाचे बारीक लक्ष असल्याने ही तस्करी पकडण्यात आली आहे. सीमाशुल्क विभागाने केलेल्या दोन तपासणीमध्ये 3 कोटींच्या फळांच्या साठ्यासह मौल्यवान कलाकृती, प्राण्यांचे कातडे असा कोट्यवधीचा माल न्हावा शेवा सीमाशुल्क
विभागाने जप्त केला आहे.
मंगळवारी दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका कंटेनर मधून झेब्राची कातडी, दुर्मिळ अशा मौल्यवान कलाकृती, लॅरी नार्टन लंबार्ट यांसारख्या जगप्रसिद्ध चित्रकारांची 38 दुर्मिळ चित्रे असा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान, एक दिवस अगोदर इराणीयन किवी फळांच्या 177 मेट्रिक टनाच्या कंटेनरच्या तपासणीत 3 कोटी रुपयाचे 32 मेट्रिक टॅन नेकट्रराईन फळे आढळली .
सीमाशुल्क विभागाला गुप्त माहिती मिळाल्यानंतर मंगळवारी तपासणी केली असता. कागदोपत्री घरगुती वस्तू नमूद करून प्रत्यक्षात दुर्मिळ वस्तूंची तस्करी करण्यात येत असल्याची बाब उघड झाली आहे.