रायगड : एक्स्प्रेस -वेवर 8 ब्लॅक स्पॉट… कळंबोली सर्कल ते लोणावळा घाट सर्वाधिक अपघाताचा मार्ग | पुढारी

रायगड : एक्स्प्रेस -वेवर 8 ब्लॅक स्पॉट... कळंबोली सर्कल ते लोणावळा घाट सर्वाधिक अपघाताचा मार्ग

पनवेल;  विक्रम बाबर :  शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर मुंबई -पुणे द्रुतगती महामार्ग पुन्हा चर्चेत आला आहे. महामार्गावरील अपघातांना जबाबदार कोण असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे . त्यामध्ये वाहन चालक की महामार्ग प्रशासक जबाबदार असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

कळंबोली सर्कल ( मॅकडोनाल्ड ) पॉईंटपासून या द्रुतगती महामार्गाला सुरवात होते. मात्र या अपघाताची मालिका या
महामार्गाच्या सुरवातीपासूनच होते. कारण महामार्गावर प्रवाशी वाहतुकीसाठी बेशिस्त पद्धतीने उभी केली जाणारी वाहने हे अपघातांना निमंत्रण देत आहेत. तसेच या 0 किमी च्या पॉईंटवर प्रवाशांची उतरवण्यासाठी होणारी लगबग हेही अपघाताला करणीभूत ठरू लागले आहे. या 0 किमी ये 7 किमी अंतराच्या प्रवासात एक नाही तर तब्बल 10   ट्रॅव्हल्सचे अपघात झाल्याचे समोर आले आहे.या अपघात पॉईंट सोबत महामार्गावर जवळपास 8 ब्लॅक पॉईंट असल्याचे दिसून येते.

या ब्लॅक पॉईंट जवळच सर्वाधिक अपघात होत आहेत. यामध्ये अंडा पॉईंट आणि अमृतांजन ब्रिज तसेच घाटातील उतार हे अपघातांना आमंत्रण देत आहे. लोणावळा घाट उतरताना जवळपास 40 टक्क्यांहून अधिक अपघात झाले आहेत. घाटातील उतार उतरताना अनेक वाहन चालक गाड्या न्यूट्रलमध्ये चालवताना आढळून आले आहे. यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटते आणि अपघातांना हे चालक बळी पडतात. अश्या पद्धतीचे अपघात हे पहाटे 3 ते 5 च्या दरम्यान झाल्याचे महामार्ग प्रशासनाकडून सांगितले जात आहे. गाडी न्यूट्रल  केल्याने ब्रेकचा कंट्रोल इंजिन पासून तुटतो आणि वाहन बेभान होऊन पळते.

  • अचानक ब्रेक दाबल्यानंतर वाहन पलटी होणे, दुसर्‍या वाहनांना जाऊन ठोकणे अश्या पद्धतीने अपघात होत आहे. त्यासोबत अंडा पॉईंट हा अपघाताचा मुख्य पॉईंट आहे.
  • वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या अंडा पॉईंटचा उपोयग केला जातो. या पॉईंटवर अचानक वाहन थांबवणे, उलट दिशेने वाहन घेऊन जाणे हे कारणीभूत ठरत आहे.

 

Back to top button