रायगड : श्रावणी सोमवारी श्री क्षेत्र कनकेश्वर येथे भक्तांची मांदियाळी | पुढारी

रायगड : श्रावणी सोमवारी श्री क्षेत्र कनकेश्वर येथे भक्तांची मांदियाळी

अलिबाग; पुढारी वृत्तसेवा : रायगड जिल्ह्यातील प्रमुख व अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्रांपैकी एक असे मापगांव जवळील श्री कनकेश्वर येथे अंदाजित 50 हजार पेक्षा जास्त भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. तर येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट
बंदोबस्त करण्यात आला होता. कनकेश्वर देवस्थान हे अलिबाग शहरापासून 10 किमी अंतरावर डोंगराच्या कुशीत निसर्गरम्य व निसर्गाने नटलेल्या ठिकाणी कनकेश्वर देवस्थान आहे.  याठिकाणी जाण्यासाठी सुमारे 750 पायर्‍या चढून जावे लागते. या देवस्थानच्या ठिकाणी दर श्रावणी सोमवारला मोठी गर्दी असते.

सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे व स्वातंत्र्या दिनानिमित्त सुट्टी असल्याने आल्हाददायक वातावरणात भक्तांनी मोठ्या प्रमाणावर रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली आहे. ही गर्दी गेल्या काही वर्षांतील सर्वात मोठी गर्दी व माझ्या आयुष्यातील न पाहिलेली भक्तांची गर्दी असल्याचे स्थानिक ग्रामस्थ व कनकेश्वर भक्त मंगेश चिंतामण राऊत यांनी सांगितले.

भक्तांची गैरसोय होऊ नये व कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदाव्यवस्था बिघडू नये यासाठी मापगांव ग्रामपंचायतीने पोलीस व ग्रामसुरक्षा दलामार्फत कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. नागरिकांनी व भक्तांनी पोलीस व स्वयंसेवक यांना सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे. पावसाळा सुरू झाला की कनकेश्‍वर येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची आणि पर्यटकांची गर्दी येथे पहावयास मिळते. येथे शंकराचे देवस्थान असून 750 पायर्‍या चढून येथे जावे लागते.

Back to top button