पनवेल : कर्नाळा पक्षी अभयारण्यात ट्रेकर्सचा हृदयविकाराने मृत्यू | पुढारी

पनवेल : कर्नाळा पक्षी अभयारण्यात ट्रेकर्सचा हृदयविकाराने मृत्यू

पनवेल; पुढारी वृत्तसेवा : पनवेल येथील कर्नाळा अभयारण्यात एका ट्रेकर्सचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सुरेंद्र रवींद्र जाळीहाल (वय ३८, रा. पुणे ) असे त्‍यांचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.

पश्चिम घाटांच्या डोंगररांगेत असलेल्या कर्नाळा अभयारण्यात अनेकजण ट्रेकिंगसाठी जात असतात.  शनिवारी पुणे येथील ट्रेनेटी ॲडवेंचर ग्रुपचे २८ ट्रेकर्स पनवेल तालुक्यातील कर्नाळा अभयारण्यात ट्रेकिंगसाठी गेले होते. सकाळी साडेदहाच्या सुमारास ट्रेकिंग सुरू असताना सुरेंद्र यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचलंत का?

Back to top button