

कर्जत, पुढारी वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील खांडपे येथील एका नामांकित रिसॉर्ट मध्ये ठाणे येथून पाच मित्र आले होते. हे सर्वजण आज (शुक्रवार) दुपारी १ च्या सुमारास रिसॉर्टजवळून वाहणाऱ्या उल्हास नदीत पोहायला उतरले. मात्र, नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने अक्षय दोडिया ( वय २०) या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की आणि पोलीस पथकाने घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरू केले. खोपोली रेस्क्यू टीम आणि ग्रामस्थांच्या मदतीने शोध घेऊन मृतदेह बाहेर काढण्यात आला.
या प्रकरणी कर्जत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचलंत का ?
पहा व्हिडिओ : दुष्काळ ते 300 एकर ऊस लागवड करण्याऱ्या हिंगणगावाची गोष्ट