हडपसर : वाहनांच्या वेगाला खड्ड्यांचा अडसर; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे उपनगरांत वाहतूककोंडीचे चित्र

हडपसर : वाहनांच्या वेगाला खड्ड्यांचा अडसर; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे उपनगरांत वाहतूककोंडीचे चित्र
Published on
Updated on

हडपसर, पुढारी वृत्तसेवा: संततधार पावसामुळे ठिकठिकाणी उखडलेले रस्ते आणि निर्माण झालेल्या खड्ड्यांनी येथील वाहतूक मंदावली असून, उपनगरांतील विविध भागांतील रस्त्यावर वाहतूक कोंडीचे चित्र आहे. त्यामुळे उपनगरांतील रोजच्या कामासाठी येणार्‍या चाकरमानी मंडळींसह विद्यार्थी आणि महिला यांना मोठ्या त्रासास सामोरे जावे लागत आहे. नालेसफाई, चेंबरदुरुस्ती, रस्ते व खड्ड्यांची डागडुजी आदी कामे म्हणजे नगरपालिकेने केलेला केवळ दिखावा होता, हे पावसाने उघडे पाडले आहे.

हांडेवाडी रोड रेल्वेक्रॉसिंग, चिंतामणीनगर, सातवनगर व भुजबळ चौक, सय्यदनगर रेल्वेफाटकाजवळील परिसर खड्डे, राडारोडा आणि साचलेल्या पाण्याच्या चक्रव्यूहात अडकला आहे. मलमपट्टी केलेले रस्ते व खड्डे पावसाने उघडे पडलेले आहेत. हे खड्डे, साचलेले पाणी, यामुळे वाहनांचा वेग कमी होऊन ठिकठिकाणी वाहतूक कोंडीलाही सामोरे जावे लागत आहे. अण्णासाहेब मगर महाविद्यालयासमोर, रविदर्शन चौक, गाडीतळ पुलाखालील परिसर, गांधी चौक, डी मार्ट रस्ता, डीपी रस्त्यावरील चौक, मगरपट्टा चौक या भागांतही हीच परिस्थिती दिसत आहे. स्थानिक महिला नीता उरसळ म्हणाल्या, 'ससाणेनगर येथे पावसाळ्यात जलवाहिनी टाकायचे काम सुरू आहे.

त्यामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व महिलांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दुचाकी चालकांसाठीही हा प्रवास खूप धोकादायक ठरत आहे. त्यामुळे होणार्‍या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
ससाणेनगर नवनाथ चौकापासून हडपसर येथील दत्त मंदिरापर्यंत रस्त्याच्या डाव्या बाजूला पाण्याची लाइन टाकण्यासाठी खोदकाम केलेले आहे. पुणे महापालिकेचे कनिष्ठ अंभियंता शैलेश क्षीरसागार म्हणाले,संततधार पावसामुळे खड्डे पडले.त्यातच वाहनांची गर्दी व पाऊस सुरु होता.लवकरच खड्डे बुजवण्याची मोहिम सुरु केली जाईल

गोंधळेनगर येथील बनकर शाळेजवळ टी चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साठून राहत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकीचालक या पाण्यात पडल्याच्या घटना घडल्या आहेत. येथील रस्ते नुकतेच करण्यात आले असले, तरी पावसात झालेल्या दुरवस्थेमुळे त्याचा दर्जा किती चांगला, ही बाब निदर्शनास येत आहे.
– बाळासाहेब गोंधळे, स्थानिक नागरिक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news