दिनेश गुप्ता
पुणे : 'पुणे हे पेन्शनरांचे शहर व स्वर्ग' अशी ओळख पूर्वी होती. आता मात्र पर्यावरणाचा र्हास करणारे अतिप्रदूषित शहर होत असल्याचा ताशेरा मारत प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यांच्या वार्षिक अहवालात नोंद घेतली आहे. शहरातील स्वारगेट व कर्वे रोड राज्यातील सर्वांत प्रदूषित परिसराच्या यादीत नोंदविला गेला असून, महापालिका परिसर व भोसरी हे भागही हवा प्रदूषणात धोक्याची पातळी ओलांडत आहेत.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने दरवर्षी राज्यातील सर्व शहरांचा पर्यावरण अहवाल जाहीर केला जातो. मंडळाने नुकताच 2020-2021 सालचा अहवाल जाहीर केला आहे. यात अतिशय गंभीर बाबी त्यांनी मांडल्या आहेत. प्रमुख आठ शहरांना अतिप्रदूषित शहरांच्या यादीत टाकले आहे. यात पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, नाशिक आणि पिंपरी-चिंचवड या शहरांचा समावेश आहे. प्रामुख्याने या सर्वंच शहरातील पिण्याच्या पाण्याचा दर्जा खालावत चालला असून, कोल्हापूर शहरातील पाणी पिण्यायोग्य नसल्याची नोंद या अहवालात घेण्यात आली आहे. तर, पुणे शहरातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस धोक्याची मर्यादा ओलांडत आहे.
बीओडी-सीओडी दर्जा खालावण्यात पुणे आघाडीवर
मनपा परिसर, भोसरी धोक्याच्या पातळीवर
प्लास्टिक कचर्यातदेखील पुणे टॉपवर
जल व वायुप्रदूषणात पुणे राज्यात वेगाने आघाडीवर जात असून, शहरातील आठ ठिकाणचे हवेचे सॅम्पल तपासले असता स्वारगेट हा परिसर राज्यात अतिप्रदूषित शहरांच्या यादीत आला आहे. यापाठोपाठ पुणे महापालिका परिसर, कर्वे रोड, नळस्टॉप व भोसरी परिसराचा समावेश आहे. पुणे शहरात पीएम 10 च्या प्रमाण मर्यादेची सीमा ओलांडून नायट्रस ऑक्साईड व सल्फर डायऑक्साइडचे प्रमाणही वाढत आहे, अशी माहिती अहवालात देण्यात आली आहे.
लास्टिक कचर्यातदेखील पुणे आघाडीवर…
राज्यातील अनेक शहरांत प्लास्टिक कचरा मोठी समस्या बनत आहे. मात्र, त्यावर रिसायकलिंगची प्रक्रिया हा उपाय करण्यात आला आहे. असे असले, तरी तयार होणारा कचरा, गोळा केला जाणारा कचरा व त्याचे रिसायकलिंग याचे प्रमाण मात्र बर्यापैकी व्यस्त आहे. यातही पुणे आघाडीवर असून, येथे तब्बल 59 हजार 295 टन एवढा प्लास्टिक कचरा तयार होतो. त्यातील 58 हजार 136 टन कचर्याचेच रिसायकलिंग होत असल्याचे या अहवालात नमूद केलेले आहे. पुण्यापाठोपाठ नाशिक, चंद्रपूर, अमरावती, औरंगाबाद, कल्याण, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नवी मुंबई, रायगड, ठाणेचा नंबर लागतो.
बीओडी-सीओडी दर्जा घसरणारी शहरे…
बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड (बीओडी) व केमिकल ऑक्सिजन डिमांड (सीओडी) हे घटक पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाचे असतात. राज्यातील 11 शहरांमधील मोठे, मध्यम व लघुउद्योग यांचा मोठ्या प्रमाणावर रेड झोनमध्ये समावेश आहे. त्यामुळे 11 जिल्ह्यांतील जमिनीखालची पाणीपातळी खराब होत आहे. यात पुणे, औरंगाबाद, चंद्रपूर, ठाणे, कोल्हापूर, नवी मुंबई, नागपूर, नाशिक, मुंबई, रायगड व कल्याण या शहरांचा समावेश आहे.
प्रदूषणाची स्थिती (एसओटू एनोएक्स पीएम 10)
परिसर मर्यादा
50 मर्यादा
40 मर्यादा
60 पातळी
स्वारगेट 20 60 145 घातक
नळस्टॉप 17 51 101 धोकादायक
सोलापूर रोड 9 30 69 धोकादायक
पीसीएमसी 21 50 80 धोकादायक
रेड झोनमधील उद्योग
(बीओडी-सीओडी दर्जा)
शहर मोठे मध्यम लघू
पुणे 1622 401 4041
नाशिक 596 148 2343
नागपूर 529 07 1379
नवी मुंबई 262 48 1228
कोल्हापूर 424 122 1885
ठाणे 293 57 1141
चंद्रपूर 228 09 295
औरंगाबाद 395 142 980
मुंबई 494 96 699
रायगड 301 61 503
कल्याण 271 150 2042