

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा: पूर्णानगर कुदळवाडी रस्ता चिखली पोलिस स्टेशनसमोर रस्त्यावर ऑईल सांडल्याने दुचाकी घसरून पडण्याचे प्रकार घडले. स्थानिक नागरिकांनी या ऑईलवर माती टाकल्याने अनेक अपघात रोखले गेले. पूर्णानगर येथे रस्त्यावर ऑईल सांडल्यामुळे रस्ता घसरडा झाला होता. यापूर्वी शहरामध्ये ऑईल सांडल्यामुळे वाहने घसरून पडण्याच्या घटना घडल्या आहेत.
त्यामुळे अपघात घडण्यापूर्वीच खबरदारी घेवून येथील स्थानिक नागरिकांनी सर्तकता दाखवून कोणत्याही संबंधित यंत्रणेची वाट न पाहता रस्त्यावर माती आणून टाकली. त्यामुळे वाहन चालकांना वाहने सुरक्षित चालविता आली आणि अपघात टळले.