पिंपरी : सेक्सटॉर्शन’च्या शिकार महिलाही ! सहा महिन्यांत 15 जणींची पोलिसात धाव

पिंपरी : सेक्सटॉर्शन’च्या शिकार महिलाही ! सहा महिन्यांत 15 जणींची पोलिसात धाव
Published on
Updated on

संंतोष शिंदे

पिंपरी : सोशल मीडियावरील अनोळखी तरुणी व्हिडिओ कॉलवर पुरुषाला विवस्त्र होण्यास सांगून नंतर ब्लॅकमेल करतात. मात्र मागील सहा महिन्यांत पिंपरी-चिंचवड परिसरातील 15 महिला सेक्सटॉर्शनच्या शिकार झाल्याची पोलिस दप्तरी नोंद आहे. फेसबुकवरून सुंदर तरुणी चॅटिंग करून टार्गेट फिक्स करतात. मोबाईल क्रमांक मिळवल्यानंतर स्वतः नग्न होऊन व्हिडिओ कॉलवर समोरच्या व्यक्तीलाही कपडे काढण्यास भाग पाडतात. नग्न तरुणी पाहिल्यानंतर अनेक आंबटशौकीन मंडळी स्वतःचे कपडे उतरवण्यास तयार होतात. त्यावेळी तरुणी व्हिडिओ रेकॉर्ड करतात. त्यानंतर तरुणी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करू लागते.

बदनामीच्या भीतीने काहीजण पैसे देऊन टाकतात. मात्र, पैशांचा तगादा सलग काही दिवस सुरू राहतो. शेवटी आपल्या हातून झालेल्या चुकीचा कोणीतरी गैरफायदा घेत असल्याचे संबंधित पुरुषाच्या लक्षात येते. त्यानंतर खजील होऊन पोलिसांकडे तक्रार देतात. पुरुषांच्या तक्रारींवर पोलिस यंत्रणा काम करीत असताना आता महिलांच्या देखील अशाच तक्रारी येऊ लागल्याने पोलिसही चक्रावले आहेत. मागील सहा महिन्यांत पिंपरी- चिंचवड परिसरातील 15 महिला सेक्सटॉर्शनच्या शिकार झाल्या आहेत. यामध्ये बहुतांश प्रकरणामध्ये महिलांचा हलगर्जीपणा समोर आला आहे.

कलह कारणीभूत
वैवाहिक जीवनातील कलहामुळे सेक्सटॉर्शनचे प्रकार वाढले आहेत. जोडीदाराकडून लैंगिक अपेक्षा पूर्ण न होणे, कमी वयात झालेले घटस्फोट या बाबी सेक्सटॉर्शनसारख्या रॅकेटमागे महत्त्वाची कारणे आहेत.

फेसबुक, व्हॉट्सऍप व इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियाच्या विविध माध्यमांतून मैत्री करून व्हॉट्सऍपद्वारा किंवा फेसबुक मेसेंजरद्वारा व्हिडिओ कॉल करून अश्लील प्रकारचे कृत्य करण्यास भाग पाडून आपला व्हिडिओ रेकॉर्ड केला जात आहे. तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन सायबर चोरटे पैशांची मागणी करीत आहेत. पुरुषांसह महिला देखील अशा प्रकाराला बळी पडत आहेत. त्यामुळे सोशल मीडिया हाताळताना काळजी घ्या.

                                   – डॉ. संजय तुंगार, सायबर सेल, पिंपरी – चिंचवड

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news