सिंहगड रस्त्यावर मंगळसूत्र चोरी

सिंहगड रस्त्यावर मंगळसूत्र चोरी
Published on
Updated on

पुणेः सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय ते वडगावकडे जाणार्‍या रस्त्यावरून एक महिला शनिवारी (दि.25) रात्री सव्वानऊच्या सुमारास निघाल्या होत्या. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 60 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसका मारून चोरी केले.याप्रकरणी शेळकेनगर येथील 37 वर्षीय महिलेने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघा चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

32 हजारांचा ऐवज चोरीला
भाग्योदयनगर-कोंढवा येथील जहीर शेख (वय 40) यांच्या घरात चोरट्यांनी चोरी करून रोकड, घड्याळे असा 32 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली आहे. शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोंढवा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news