जुन्नर : पुढारी वृत्तसेवा : कोरोना पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेला सावरगाव (ता. जुन्नर) येथील आठवडी बाजार गुरुवार (दि. 30) पासून पुन्हा सुरू करण्यात आला आहे. येथे किराणा तसेच काही भाजीपाल्यांच्या व्यापार्यांनी पाल ठोकले होते.
येत्या आठवड्यापासून सावरगाव व परिसरातील व्यापार्यांनी तसेच शेतकर्यांनी बाजारात मालविक्रीसाठी यावा, असे आवाहन उपसरपंच दीपक बाळसराफ यांनी केले. बाजारात दुकान थाटणार्या व्यापार्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी राजन बाळसराफ, नारायण खिल्लारी, दादाभाऊ मनसुख, नवनाथ गिदे, भगवान क्षीरसागर, रामकृष्ण भागवत आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.