साखरेचा जुलैसाठी 21 लाख टन कोटा; मुबलक कोट्यामुळे दरपातळी स्थिरावणार

साखरेचा जुलैसाठी 21 लाख टन कोटा; मुबलक कोट्यामुळे दरपातळी स्थिरावणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा: केंद्र सरकारने जुलै महिन्यासाठी साखरेचा 21 लाख टनांचा कोटा खुला केलेला आहे. पावसाळ्यामुळे साखरेस मागणी कमीच राहत असल्याने मागणीच्या तुलनेत मुबलक कोटा असल्याची माहिती घाऊक बाजारपेठेतून देण्यात आली. त्यामुळे साखरेच्या दरावर फारसा परिणाम होणार नसल्याचे सांगण्यात आले. मे आणि जून महिन्यातही साखरेची दरपातळी स्थिरावल्याचेच पाहावयास मिळाले. देशात साखरेचे झालेले विक्रमी उत्पादन आणि असलेला शिल्लक मुबलक साठा यामुळे साखरेचे दर स्थिरावण्यास मदत झालेली आहे.

जुलै महिन्यात पावसाळ्यामुळे साखरेचा खप हा मे व जून महिन्याच्या तुलनेत कमीच राहतो. साखरेचा कोटा जाहीर झाल्यानंतर घाऊक बाजारातील साखरेचे प्रति क्विंटलचे दर 3500 ते 3550 रुपयांवर स्थिरच राहिले आहेत, तर कारखान्यांवर साखरेच्या निविदा 3220 ते 3250 रुपये या दराने विकल्या जात असल्याचे सांगण्यात आले. मागणी साधारण राहण्याच्या अपेक्षेने गरजेइतक्याच साखरेच्या खरेदीकडे व्यापार्‍यांचा कल राहतो. त्यामुळे साखर दरात चढ-उतार न होता ते स्थिरावण्याचा अंदाज व्यापार्‍यांकडून वर्तविण्यात आला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news