सणसरला वडाचे झाड पडले, बारामती – इंदापूर रस्त्यावरील वाहतूक ठप्प

सणसरला वडाचे झाड पडले, बारामती – इंदापूर रस्त्यावरील वाहतूक ठप्प

भवानीनगर : पुढारी वृत्तसेवा : सणसर (ता. इंदापूर) येथे जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर बारामती – इंदापूर रस्त्यावर वडाचे जुने झाड पडल्याने या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. सुदैवाने यामध्ये जीवित हानी झाली नाही. बारामती – इंदापूर रस्त्यावर रविवारी (दि. 21) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सणसर जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर वडाचे झाड पडले. वडाचे झाड रस्त्यावर पडत असताना रस्त्यावरून कोणतेही वाहन जात नव्हते.

त्यामुळे कोणतीही हानी झाली नाही. वडाचे झाड जुने असून ते रस्त्यावर पडल्यानंतर रस्त्याच्या पलीकडच्या बाजूचे काहीच दिसत नव्हते. झाड रस्त्यावर पडल्याने झाडाच्या फांद्यांचा मोठ्या प्रमाणात वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. दुचाकी व चार चाकी छोट्या वाहनांसाठी जलसंपदा कार्यालयाच्या वसाहतीतून पर्यायी मार्ग असल्याने झाड पडले तरी रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या नाहीत. केवळ अवजड वाहने वाहनचालकांना थांबावे लागले.

झाड पडल्यानंतर येथील अनेक युवक मदतीसाठी धावून आले. त्यांनी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यास मदत केली. रस्त्यावर पडलेले झाड काढण्यासाठी येथील कार्यकर्त राजेंद्र निंबाळकर, खरेदी-विक्री संघाचे संचालक अमोल भोईटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news