संत नामदेव शाळेतील झाड उन्मळून पडले

संत नामदेव शाळेतील झाड उन्मळून पडले

महर्षीनगर : महर्षीनगर भागातील महापालिकेच्या संत नामदेव शाळेतील जुने मोठे झाड पहाटे सहा वाजेच्या सुमारास उन्मळून पडले.
पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर किंवा शाळेत विद्यार्थी नव्हते. पण शाळेलगत असलेल्या सुरक्षा भिंत, दोन रिक्षा, चार दुचाकी, एक कार, एक हातगाडी यांचे नुकसान झालेले आहे. याबद्दल अद्यापही कोणाची तक्रार नोंद झालेली नाही. पडलेले झाडं हे शाळा परिसरात होते.

पाऊस, वारा यामुळे झाड पडल्याची माहिती स्थानिकांनी दिली. स्थानिक लोकांचे नशीब बलवत्तर म्हणून झाडं चौकात मधोमध पडले. सीमाभिंतीचा आधार असल्यामुळे झाड पडताना त्यास गती नव्हती. झाडाच्या पश्चिम बाजूला चाळ आहे. पहाटेच्या वेळी विद्यार्थी नसल्याने परिसरात गर्दी नव्हती, त्यामुळे जीवहानी टळली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news