श्रावणाच्या पार्श्वभूमीवर फुलांची आवक वाढली

झेंडू, शेवंती
झेंडू, शेवंती

पुणे; पुढारी वृत्तसेवा: श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर यंदा शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात झेंडू, शेवंतीच्या फुलांची लागवड केली आहे. परिणामी, गत आठवड्यापासून बाजारात फुलांची वाढलेली आवक टिकून आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने बाजारात दर्जेदार फुले दाखल होत असून त्यांना मागणीही चांगली असून दर स्थिर आहेत.

येत्या शुक्रवार (दि. 29) पासून सणांचा महिना असलेला श्रावण महिना सुरू होत आहे. या काळात विविध व्रतवैकल्ये केले जात असल्याने येत्या काळात फुलांना मागणी वाढेल. तसेच, या काळात फुलांना दरही चांगले मिळतील अशी माहिती फुलांचे व्यापारी सागर भोसले यांनी दिली.

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : 10-30, गुलछडी : 50-60, अ‍ॅष्टर : जुडी 20-30, सुट्टा 100-150, कापरी : 10-30, शेवंती : 50-80, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : 10-30, गुलछडी काडी : 10-20, डच गुलाब (20 नग) : 30-60, जर्बेरा : 10-20, कार्नेशियन : 80-100, शेवंती काडी 70-120, लिलियम (10 काड्या) 800-1000, ऑर्चिड 400-500, ग्लॅडिओ (10 काड्या) : 100-120, मोगरा 300-500.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news