

भिगवण; पुढारी वृत्तसेवा: भिगवण जवळील आनंद हॉटेलमध्ये वेश्या व्यवसायावर भिगवण पोलिसांनी छापा टाकून तीन महिलांची सुटका केली. या प्रकरणी हॉटेलचे मालक व चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून चालकाला अटक केली आहे. नामदेव बंडगर व हॉटेल चालक गजानन लक्ष्मण ठाकूर (रा.आनंद हॉटेल मदनवाडी ता.इंदापुर, पुणे,मूळ रा.गंगाखेड, परभणी)यांच्यावर स्त्री व मुलींचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यांव्ये गुन्हा दाखल करून ठाकूरला अटक केली आहे.
भिगवण येथील हॉटेल आनंद येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम, इन्कालाब पठाण, महेश उगले, अंकुश माने, हसीम मुलाणी, महिला पोलीस प्रिया पवार या पथकाने छापा टाकून हि कारवाई केली.