वेल्ह्यातील गट, गण जैसे थे; नावात बदल

वेल्ह्यातील गट, गण जैसे थे; नावात बदल

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अवघ्या सहा जागा असलेल्या वेल्हे तालुक्यातील जिल्हा परिषदेचे दोन गट व तालुका पंचायत समितीचे चार गण नवीन प्रभागरचनेत जैसे थे ठेवण्यात आले आहेत. मात्र, गट व गणांच्या नावात बदल करण्यात आला आहे. काही राजकीय नेत्यांनी अनुकूल गावांची अदलाबदल करण्याचे जोरदार प्रयत्न केले होते. मात्र, प्रत्यक्षात नवीन प्रभागरचनेत कोणतेही बदल झाले नाहीत.

जिल्हा परिषदेच्या कुरण खुर्द- विंझर गटाचे विंझर-पानशेत असे नाव केले आहे. या गटात 61 गावे आहेत. तर वेल्हे- मार्गासनी गटाचे नाव वेल्हे बुद्रुक- वांगणी असे केले आहे. या गटात 69 गावे आहेत.

विंझर-पानशेत जिल्हा परिषद गट :- पानशेत पंचायत समिती गण- हिरपोडी, अंत्रोली, धानेप, विहीर, चापेट, कोंढावळे खुर्द, कोंढावळे बुद्रुक, घिसर, घोल, दापसरे, गिवशी, आंबेगाव बुद्रुक, गोंडेखल, कुर्तवडी, घोडखल, कादवे, कानंद, बोपलघर, कोशिमघर, कांबेगी, कसेडी, चिखली, भालवडी, कुरण बुद्रुक, माणगाव, चांदर, पोळे, ठाणगाव, मोसे बुद्रुक, साईव बुद्रुक, शिरकोली, घोडशेत, टेकपोळे, खानू, वडघर, धिंडली, वरसगाव, आंबेगाव खुर्द, घोलपघर, कुरवटी, गेवंडे, निवी, कुरण खुर्द, पानशेत, वांजळेवाडी, रानवडी आणि भट्टी वागदरा. विंझर पंचायत समिती गण- आंबेड, दापोडे, कोंडगाव, खामगाव, पाबे, लाशिरगाव, मालवली, निगडे मोसे, ओसाडे, रांजणे, रुळे, विंझर, खांबवडी आणि कोळवडी.

वांगणी- वेल्हे बुद्रुक जिल्हा परिषद गट : वांगणी पंचायत समिती गण- आंबवणे, चिंचले बुद्रुक, आसनी दामगुडा, आसनी मंजाई, बोरावळे, चिंचले खुर्द, करंजावणे, कातवडी, कोदवडी, चिरमोडी, घावर, मांगदरी, केतकावणे, मार्गासनी, आस्कवडी, आडवली, भागिनघर, निगडे बुद्रुक, सोंडे हिरोजी, सोंडे कार्ला, सोंडे सरपाले, सोंडे माथना, सुरवड, वडगाव झांजे, वांगणी आणि वांगणीवाडी. वेल्हे बुद्रुक पंचायत समिती गण – बालवाड, हारपूड, सिंगापूर, मोहरी, एकलगाव, जाधववाडी, पासली, माजगाव, केळद, निगडे खुर्द, भोर्डी, पिशवी, गुगुळशी, कर्णवडी, पांगारी, खरिव, कोलंबी, वरोती बुद्रुक, वरोती खुर्द, लव्ही खुर्द, लव्ही बुद्रुक, दादवडी, मेरावणे, फणशी, मेट पिलावरे, चराटवाडी, खोपडेवाडी, पाल खुर्द, पाल बुद्रुक, साखर, कोंढवली, शेनवड, बार्शीमाळ, वेल्हे बुद्रुक घेरा, वेल्हे बुद्रुक, ब—ाह्मणघर, खोडद, वेल्हे खुर्द, वाजेघर खुर्द, पिंपरी, वाजेघर बुद्रुक, वांजळे व गुंजवणे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news