विमाननगरमधील सिग्नल बंद असल्याने वाहतूक कोंडी

विमाननगरमधील सिग्नल बंद असल्याने वाहतूक कोंडी

Published on

वडगाव शेरी, पुढारी वृत्तसेवा: विमाननगरमधील साकोरेनगर आणि दत्त मंदिर चौकातील वाहतूक नियंत्रक सिग्नल बंद असल्याने या रस्त्यावर मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. विमानतळ, कल्याणीनगर रस्ता, साकोरेनगर येथील सिग्नल गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. यामुळे रस्त्यावर संध्याकाळी वाहतूक कोंडी होत आहे. वाहनचालक कसेही वाहने चालवतात. यामुळे सिग्नलला एकमेकांसमोर वाहने आल्याने.

वाहतूक कोंडी होते. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहेत. दत्त मंदिर चौक हा विमाननगरमधील मुख्य चौक आहे. 'सिग्नल सुरू असल्यास वाहतूक नियंत्रण योग्य पध्दतीने होते. मात्र, सिग्नल बंद पडले की वाहनचालक बेशिस्तपणे वाहने चालवतात. त्यामुळे चौकात कोंडी होते. विमाननगरमधील सिग्नल त्वरित सुरू करावे,' अशी मागणी शिवकर्म प्रतिष्ठानचे अध्यक्ष उध्दव गलांडे यांनी वाहतूक विभागाकडे केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news