वारजे कॅनॉल रस्त्यावर पाण्याचे तळे

 वारजे कॅनॉल रस्त्यावरील पाण्याचा निचरा न झाल्याने रस्त्याला आलेले तळ्याचे स्वरूप.
वारजे कॅनॉल रस्त्यावरील पाण्याचा निचरा न झाल्याने रस्त्याला आलेले तळ्याचे स्वरूप.

वारजे; पुढारी वृत्तसेवा: वारजे येथील कॅनॉल रस्त्यावर पाण्याचा निचरा होण्यासाठीचे नैसर्गिक स्त्रोत बंद झाल्याने रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. रहदारीच्या रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा वाहनचालकांसह नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. रामनगर भागाकडे जाणार्‍या या कॅनॉल रस्त्यावर पावसाच्या दिवसांत फुटभर पाणी साचून राहत आहे. हे पाणी वाहून जाण्यासाठी कोणताही मार्ग नसल्याने वाहनचालकांसह नागरिकांना या पाण्यातूनच ये-जा करावी लागते.

या ठिकाणाहूनच सह्याद्री शाळा काही अंतरावर असल्याने चिमुकल्यांनाही शाळेत जाताना मोठी कसरत करावी लागते. रहदारीच्या रस्त्यावरील खड्डेही पाण्याखाली गेल्याने वाहन चालविताना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यांना साचलेल्या पाण्यातूनच रस्त्याने जावे लागत आहे. दरम्यान, रस्त्यावर पावसाळी पाईप लाईनची समस्या असून यावर उपाययोजना करण्याबाबतच्या सूचना मुख्य खात्याला कळविल्या असल्याचे सहायक आयुक्त राजेश गुर्रम यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news