

पारगाव; पुढारी वृत्तसेवा: वडज धरणातून मीना नदीपात्रात बुधवारी (दि. 31) पाणी सोडण्यात आल्याने नदी आता दुथडी भरून
वाहत आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात रांजणी, वळती, नागापूर, शिंगवे या गावांसाठी मीना नदीचे पात्र वरदान ठरले आहे.
विश्रांतीनंतर वडज धरण पाणलोट क्षेत्रात बुधवारी (दि. 31) सायंकाळी मुसळधार पाऊस पडत आहे. धरणाच्या सांडव्यावरून मीना नदीपात्रात सुमारे 3 हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले. वडज धरण 93 टक्के भरले आहे. त्यामुळे शेतकर्यांची पाण्याची चिंता पूर्णपणे
मिटली आहे.