लोहगावचे प्रश्न मार्गी लावावेत; आमदार सुनील टिंगरेंच्या महापालिका प्रशासनाला सूचना

लोहगाव येथे महापालिका अधिकार्‍यांसोबत पाहणी करताना आमदार सुनील टिंगरे.
लोहगाव येथे महापालिका अधिकार्‍यांसोबत पाहणी करताना आमदार सुनील टिंगरे.
Published on
Updated on

येरवडा; पुढारी वृत्तसेवा: नवीन पर्यायी रस्त्यांची कामे पूर्ण करावीत. रस्त्यांवर पडलेले खड्डे लवकरात लवकर बुजविण्यात यावेत. रस्त्यांची दूरवस्था दूर करून नागरिकांना भेडसावणार्‍या समस्या तात्काळ सोडविण्याच्या सूचना आमदार सुनील टिंगरे यांनी महापालिका प्रशासनास केल्या. लोहगाव परिसरातील विविध रस्त्यांच्या कामांची पाहणी, रस्त्यांवर पडलेले खड्डे तसेच पोरवाल रोड येथील रस्त्याच्या भूसंपादनाच्या कामाची पाहणी आमदार सुनील टिंगरे यांनी अधिकार्‍यांसमवेत केली. यावेळी महापालिकेचे पथ विभागाचे प्रमुख व्ही.जी. कुलकर्णी, पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरूद्ध पावसकर व इतर अधिकारी उपस्थित होते.

टिंगरे म्हणाले की, लोहगाव परिसरातील खंडोबा माळ, पठारे वस्ती व इतर अनेक ठिकाणच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. अशा रस्त्यांमुळे नागरिकांना रस्त्यावरून जाताना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी अधिकार्‍यांसोबत पाहणी केली. यावेळी नागरिकांनीदेखील अनेक समस्या अधिकार्‍यांच्या पुढे मांडल्या.

पोरवाल रस्ता परिसरातील मुख्य रस्त्यावर होणारी वाहतूक समस्या दूर करण्यासाठी पर्यायी रस्ता नियम 205 च्या अंतर्गत करण्यात येत आहे. या रस्त्यांसाठी 200 मीटरचे भूसंपादन बाकी आहे. ते लवकर पूर्ण करण्याच्या सूचना टिंगरे यांनी अधिकार्‍यांना दिल्या. ऑर्चिड हॉस्पिटल शेजारील आर.पी. रोड सुरू करणे आवश्यक आहे.

पाणी पुरवठ्याची सर्व कामे लवकर पूर्ण करा
साठे वस्ती तसेच पोरवाल रोड परिसरातील नागरिकांनादेखील पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे. याकरिता 8 इंचांची नवीन पाइपलाइन टाकण्यात आली आहे. ग्रॅविटीने पाइपलाइनमधून पाणी घेऊन जाण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या परिसरासाठी पाइपलाइनला बूस्टर लावण्याचे काम 15 दिवसांत केले जाणार आहे. पाणी पुरवठ्याची सर्व कामे लवकर पूर्ण करण्याचे निर्देश आ. टिंगरे यांनी प्रशासनास दिले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news