

लोणावळा : लोणावळा शहराला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून, शनिवारी (दि.9) सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत या 10 तासात तब्बल 100 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतरही पावसाचा जोर कायम असल्याने लोणावळा शहराच्या अनेक सखल भागात पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
लोणावळा शहरात शुक्रवारी (दि.8) सकाळी 7 शनिवारी सकाळी 7 वाजेपर्यंत 24 तासात 155 मिमी पाऊस नोंदविण्यात आला होता. त्यानंतर पुढील 10 तासात 100 मिमी पाऊस नोंदला गेल्याने पावसाने मागील वर्षीची सरासरी गाठली आहे. लोणावळा शहरात यावर्षी शनिवारी संध्याकाळपर्यंत 1162 मिमी इतका पासून झाला आहे.
तर मागील वर्षी आजपर्यंत 1165 मिमी पाऊस झाला होता. 5 जुलै ते 8 जुलैच्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तब्बल 832 मिमी पाऊस पडला आहे. लोणावळा नगरपालिका मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या नियोजनातून आपत्तीच्या काळात काम करणार्या नगरपालिका कर्मचार्यांना शिवदुर्ग मित्रतर्फे बोट चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. बोट तयार करणे, हवेचा दाब, इंजिन विषयी माहिती, प्रत्यक्ष बोट चालवणे, आपली काळजी कशी घ्यावी, सुरक्षितपणे बचाव कार्य कसे करावे, याविषयी मार्गदर्शन
करण्यात आले.