

पुणे : पुढारी वृत्तसेवा: लग्नाच्या आमिषाने तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी मंगेश पठणे (रा. लातूर) येथील तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 25 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. ही घटना नोव्हेंबर 2019 ते ऑक्टोबर 2021 या कालावधीत घडली आहे.
फिर्यादी तरुणी व आरोपीची फोनद्वारे ओळख झाली होती. फिर्यादी तरुणी शिक्षणासाठी पुण्यात आल्यानंतर आरोपीदेखील तेथे आला. त्यानंतर प्रेमाच्या जाळ्यात खेचून लग्नाच्या आमिषाने आरोपीने तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तरुणीसोबत लग्न करण्यास आरोपीने नकार दिला. पुढील तपास बंडगार्डन पोलिस करत आहेत.