रेल्वे करणार को-ब्राॅडिंग; उत्पन्न वाढीसाठी नवा फंडा

रेल्वे करणार को-ब्राॅडिंग; उत्पन्न वाढीसाठी नवा फंडा

पुणे : पुढारी वृत्तसेवारू रेल्वेच्या पुणे विभागातील सर्व स्थानकांना आता एखाद्या कंपनीचे संस्थेचे, व्यक्तीचे नाव देता येणार आहे. कारण रेल्वे प्रशासनाने महसूल वाढीसाठी को-ब्राॅडिंग उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ई-ऑक्शनद्वारे रेल्वेकडून स्थानकांच्या नावांचे वाटप होणार आहे. रेल्वेचा महसूल वाढविण्यासाठी प्रशासनाने स्टेशनच्या को-ब्राॅडिंगची संकल्पना आणली आहे. या को-ब्राॅडिंगच्या माध्यमातून रेल्वेला एका स्थानकासाठी लाखो रुपये मिळणार आहेत. त्याचा वापर रेल्वे स्थानकाच्या सुधारणेसाठी करता येणार आहे. पुणे विभागातील 72 स्थानकांसाठी ई-ऑक्शन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी कंपनी, विद्यापीठ, खासगी संस्था आपले नाव को-ब्राॅडिंगसाठी नोंदणी करू शकणार आहेत.

को-ब्राॅडिंगची मुदत एक वर्ष…
एक वर्ष मुदतीसाठी स्थानकांवर 'ब्राॅडिंग' करता येणार आहे. या दरम्यान संबंधितांना रेल्वेच्या स्थानकावर जाहिरात फलक, होर्डिंग्ज लावता येणार आहेत. जास्तीत जास्त संस्था, कंपन्या, विद्यापीठ यांनी ई-ऑक्शन प्रक्रियेत भाग घ्यावा, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.

नकाशात मूळ नावच राहणार
स्थानकाच्या नावाला ब्राॅडचे नाव जोडल्यानंतरही वेळापत्रक, वेबसाइट, तिकिटाच्या घोषणा आणि मार्गाच्या नकाशात स्थानकाचे मूळ नावच राहणार एखादे स्थानक प्रदेश आणि देशातील दिग्गज व्यक्तींच्या नावाने असेल, तर त्या स्थानकाच्या नावापुढे ' ब्राॅड'चे नाव जोडले जाणार नाही.

पुणे विभागाअंतर्गत येणारी स्थानके

  • अ 1, श्रेणी : पुणे जंक्शन
  • अ श्रेणी :- सांगली, मिरज जंक्शन, छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, शिवाजीनगर,
  • ब श्रेणी : कराड, सातारा
  • क श्रेणी : मळवली, कामशेत, वडगाव, तळेगाव, चोरवाडी, बेगडेवाडी, देहूरोड, आकुर्डी, चिंचवड, पिंपरी, कासारवाडी, दापोडी, खडकी.
  • ड श्रेणी : बारामती, केडगाव, जयसिंगपूर, किर्लोस्करवाडी, उरुळी, हातकणंगले, जेजुरी, लोणंद.
  • ई श्रेणी : हडपसर, लोणी, यवत, पाटस, सासवड, फुरसुंगी, आलंदी, शिरवडे, आंबले, राजेवाडी, दौंड, वाल्हा, निरा, सलपा, अडकरी, वाठार, पळशी, जरंडेश्वर, कोरेगाव, रहिमतपूर, तारगाव, मसूर, शिंदवणे, शेणोली, भवानीनगर, तकारी, नांद्रे, रुकडी, घोरपुरी, वलीवडे, भिलवडी.
  • फ – श्रेणी : अमनपूर, कडेनाथ, कान्हे, कटफळ, शिफुल, खुटबाव, माधवनगर, मलडगाव, मांजरी बु. , निमशिरगाव, शिरसाई, विश्रामबाग.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news