रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर करा

रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर करा

भवानीनगर : जमिनीचे आरोग्य टिकून कमी खर्चात विक्रमी उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर करणे आवश्यक आहे. कार्यक्षम वापराने खतांची बचत हाच यशस्वी शेतीचा मूलमंत्र असल्याचे कृषी सहाय्यक शिवराज मचाले यांनी सांगितले. मानकरवाडी (ता. इंदापूर) येथे कृषी विभागाच्या वतीने कृषी संजीवनी सप्ताह पार पडला. सप्ताहात मचाले बोलत होते. शेतकर्‍यांनी माती परीक्षणानुसार खतांचे व्यवस्थापन करावे. युरिया खतासोबत निंबोळी पेंडीचा वापर किंवा निम कोटेड युरियाचा वापर केला तर नत्राचा र्‍हास कमी होतो व नत्रयुक्त खतांची बचत होते.

ऊस, भाजीपाला यासारख्या बागायती पिकांमध्ये युरिया-डीएपी ब्रिकेट्सचा वापर फायदेशीर आहे. ठिबक सिंचनातून विद्राव्य खतांचा वापर केल्याने 20 ते 25 टक्के खतांची बचत होते. असे मचाले यांनी सांगितले. मंडल कृषी अधिकारी विक्रम वाघमोडे, कृषी सहाय्यक मार्तंड देवडे, कृषी पर्यवेक्षक चितारे, घुले कृषी सहाय्यक शामकांत कांबळे, ओंकार काळे, मार्तंड वाघमारे, दत्तात्रय धापटे व शेतकरी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news