राज्यात फास्ट ट्रॅक कोर्ट अस्तित्वात नाही : भाजप नेत्या चित्रा वाघ

राज्यात फास्ट ट्रॅक कोर्ट अस्तित्वात नाही : भाजप नेत्या चित्रा वाघ
Published on
Updated on

येळेसे : राज्यात फास्ट ट्रॅक कोर्टच अस्तित्वात नाही. त्यामुळे राजकारण्यांनी दिलेल्या खोट्या आश्वासनावर विश्वास ठेऊ नका. याबाबत समाजात कोणीही चुकीचा प्रसार करू नये, असा खुलासा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला. रविवार (दि. 7) रोजी चित्रा वाघ यांनी कोथुर्णे (ता. मावळ) येथे पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.

तसेच सात वर्षीय बालिकेची हत्या करणार्‍या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी व चिमुकलीला न्याय मिळावा यासाठी बजरंग दलाकडून पवनानगर येथे करण्यात आलेल्या बेमुदत उपोषणाला चित्रा वाघ यांनी पाठिंबा दिला. या उपोषणाला राज्यभरातील विविध संघटना, ग्रुप, परिसरातील ग्रामपंचायती, विविध राजकीय पक्ष यांनी जाहीर पाठिंबा दिला. यावेळी बजरंग दलाचे सर्व कार्यकर्ते व हजारो नागरिक उपस्थित होते.

यावेळी चित्रा वाघ व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी उपोषणकर्त्यार्ंशी संवाद साधला. चित्रा वाघ यांनी ग्रामीण भागात घडलेल्या या दुर्दैवी घटनेचा निषेध केला. पोलिस प्रशासन या घटनेचा तपास योग्य दिशेने करत असून या नराधमाला लवकरात लवकर शिक्षा होण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी या घटनेची दखल घेतली असून लवकर न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. आपण सारे या लढ्यात या परिवाराला साथ देऊन राज्यात पुन्हा महिलांकडे वाकड्या नजरेने कोणी पाहणार नाही, अशी शिक्षा आरोपीला होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर मुख्यमंत्री व उपमख्यमंत्री यांना बजरंग दलाच्या शिष्टमंडळाला भेटीचे निमंत्रण दिल्यानंतर समक्ष भेटून त्यांना निवेदन देऊन पीडितेला लवकर न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिल्यानंतर बजरंग दलाकडून बेमुदत उपोषण मागे घेण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news