मोशीच्या सात मुलांचा स्केटिंगमध्ये विश्वविक्रम

मोशीच्या सात मुलांचा स्केटिंगमध्ये विश्वविक्रम

मोशी : पुढारी वृत्तसेवा:  अनेक क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी करून गावचा नावलौकिक वाढवणार्‍या मोशीकरांनी गावच्या गौरवात अजून एक मानाचा तुरा रोवला आहे. सलग 96 तास स्केटिंग करून सात मुलांनी गीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. या विश्वविक्रमामुळे मुलांच्या नावाबरोबरच गावचे नाव देखील उज्वल झाल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे.

बेळगाव येथे पार पडलेल्या 96 तास सलग रोलर स्केटिंग करण्याचा विक्रमामध्ये 496 मुलांचा समावेश होता. हा कार्यक्रम शिवगंगा रोलर स्केटिंग क्लब यांच्यामार्फत घेण्यात आला होता. त्यात मोशीच्या सस्ते स्पोर्ट्स झील अकादमीच्या सात विद्यार्थी व एक प्रशिक्षकांनी सहभाग घेतला होता. यात श्रीअंश सस्ते, अन्वेशा काशिद, श्रेयस कांबळे, श्लोक हट्टे, मुग्धा पाटील, रविशा प्रभात, श्रेष्ठ प्रभात व प्रशिक्षक प्रशांत कोरे यांची गीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

त्यांच्या या कामगिरीचे कौतुक करण्यात आले असून, अकादमीचे अध्यक्ष मिलिंद सस्ते, संचालिका विद्या काशीद यांनी अभिनंदन
केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news