मोदी भेटीच्या पार्श्वभूमीवर पोलिस महासंचालकांची देहू भेट

मोदी भेटीच्या पार्श्वभूमीवर पोलिस महासंचालकांची देहू भेट

देहूरोड : पुढारी वृत्तसेवा:  जगद्गुरु संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दि.14 जून रोजी येत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस महासंचालक यांनी देहू येथे गुरुवारी भेट दिली.

पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी देहूत भेट दिली. देहूच्या सुरक्षेचा बारीक आढावा घेतला. सेठ यांनी मुख्य मंदिरात पांडुरंगाचे दर्शन घेतले. मंदिराचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी संस्थानच्या पदाधिकार्‍यांची भेट घेतली. संजय महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे आदी यावेळी उपस्थित होते.

त्यांच्यासोबत पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे हेही उपस्थित होते. त्यांनी मंदिराचे प्रवेशद्वार, देऊळ वाड्या बाहेरचा परिसर, गावातील मुख्य ठिकाणे व मंडपाच्या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था यांचा आढावा घेतला. मंदिराच्या वतीने 29 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. पोलिस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांनी बंदोबस्ताची माहिती पोलिस महासंचालकांना दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news