पाऊस
पाऊस

मान्सून : कोकण, मध्य महाराष्ट्रात बुधवारपर्यंत मुसळधार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. 14 जुलैपर्यंत कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, पालघर, ठाणे, तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने शनिवारी वर्तविला.

राज्यात जून महिन्याचे काही दिवस आणि जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली होती. आता मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय झाला आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागांत पावसाला सुरुवात झाली आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्रात 14 जुलैपर्यंत पावसाचा जोर राहणार आहे. याबरोबरच विदर्भातील काही भागांत तुरळक ठिकाणी पाऊस बरसणार आहे, असाही अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

दरम्यान, मान्सून पुढे सरकण्यास पोषक हवामान तयार झाले आहे. त्यामुळे शनिवारपासून दिल्लीसह पंजाब हरियानाच्या काही भागांत मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

बंगालच्या उपसागरात 11 जुलै रोजी तयार होणार्‍या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून पुढे सरकण्यास मदत होणार आहे. राज्यात पाऊस सक्रिय होण्यास हा पट्टा उपयोगी पडणार आहे.

logo
Pudhari News
pudhari.news