माळेगाव : दुर्लक्षित रस्त्याचे काम सुरू

माळेगाव : दुर्लक्षित रस्त्याचे काम सुरू
Published on
Updated on

माळेगाव; पुढारी वृत्तसेवा: माळेगाव नगरपंचायत चंदननगर भागातील अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी तब्बल पंधरा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. प्रलंबित रस्त्याच्या या कामाचा प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. माळेगाव परिसरातील चंदननगर भागातील दुर्लक्षित राहिलेल्या अंतर्गत रस्त्यांचे काम करण्याची मागणी ग्रामस्थांकडून वारंवार केली जात होती. हीच बाब लक्षात घेऊन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून माजी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी रविराज तावरे यांनी रस्त्यास निधी मिळण्याबाबत प्रयत्न केले होते. अखेर त्यासाठी पंधरा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

गेले अनेक वर्ष ग्रामस्थांना या दयनीय रस्त्याचा त्रास सोसावा लागत होता. मात्र, आता निधी मंजूर झाल्यानंतर तातडीने रस्त्याचे काम सुरू केल्याने या भागातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत चंदननगर येथील नागरिक हनुमंत मोरे, भीमा गायकवाड यांच्या हस्ते कामाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी युवानेते रविराज तावरे, कुलदीप तावरे, रियाज शेख, चिमण गायकवाड, शंकर मोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news