पुणे : 13 सोनोग्राफी सेंटरवर कारवाई

पुणे : 13 सोनोग्राफी सेंटरवर कारवाई
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या आरोग्य विभागाने 13 सोनोग्राफी सेंटरवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च महिन्यात या सेंटर्सवरील मशीन 2 ते 7 दिवसांसाठी सील केले जाणार आहेत. त्याबाबत सेंटर्सना नोटिसा पाठवल्या आहेत. आरोग्य विभागातर्फे दर तीन महिन्यांनी शहरातील सुमारे 750 सोनोग्राफी सेंटरची पाहणी केली जाते. कोणत्याही त्रुटी आढळून आल्यास नोटिसा पाठवल्या जातात. पाहणीचा अहवाल सल्लागार समितीसमोर ठेवला जातो.

सेंटरकडून उत्तर आल्यावर त्याबाबत समितीशी चर्चा करून कारवाईचा निर्णय घेतला जातो. गेल्या वर्षी आरोग्य विभागाने धडक मोहीम राबवून 46 सेंटरवर कारवाई केली होती. मागील वर्षीच्या शेवटच्या पाहणीमध्ये आढळलेल्या त्रुटींबाबत समितीच्या बैठकीत चर्चा करून कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

साहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत म्हणाल्या, 'फॉर्म एफवर सही नसणे, नोंदणी वही अपूर्ण असणे, महिन्याचा अहवाल वेळेत न पाठवणे अशा कारणांमुळे 13 सोनोग्राफी सेंटरवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंबंधी नोटीस पाठवण्यात
येत आहेत.'

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news