मजूर अड्ड्यावर अतिक्रमण करणार्‍यांवर कारवाई करा; बाबा आढाव यांचा प्रशासनाला इशारा

मजूर अड्ड्यावर अतिक्रमण करणार्‍यांवर कारवाई करा; बाबा आढाव यांचा प्रशासनाला इशारा

पुणे : पुढारी वृत्तसेवा: 'मजूर अड्डा ही वास्तू ऐतिहासिक असून, तिचे जतन झाले पाहिले. या मजूर अड्ड्यावर अनैतिक धंदे व पार्किंग यांचे अतिक्रमण होत आहे. पोलिस व महापालिका प्रशासनाने या अतिक्रमणांवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल,' असा इशारा अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी दिला. मजूर अड्डा या ठिकाणी मजुरांसाठी उभारण्यात आलेल्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन आढाव यांच्या हस्ते झाले.

यावेळी डॉ. आढाव यांच्या नेतृत्वाखाली सर्व घटकांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. कृती समितीचे निमंत्रक नितीन पवार, कामगार युनियन अध्यक्ष संतोष नांगरे, राजेंद्र चोरगे, संजय साष्टे, हनुमंत बहिरट यांच्यासह अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीचे पदाधिकारी व स्थानिक मजूर उपस्थित होते. अनैतिक धंद्यांबाबत संबंधित पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निकुंभ यांच्याशी बैठकीत चर्चा झाली. या ठिकाणचे अनैतिक धंदे थांबवावेत, असे पत्र महानगरपालिकेचे आयुक्त, तसेच संबंधितांना देण्यात आल्याची माहिती हनुमंत बहिरट यांनी दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news