मगरपट्टा रस्त्यावर चेंबर खचल्याने पदपथावर खड्डा; नागरिक त्रस्त

मगरपट्टा रस्त्यावर चेंबर खचल्याने पदपथावर खड्डा; नागरिक त्रस्त
Published on
Updated on

हडपसर : मुंढवा-मगरपट्टा रस्त्यावरील पदपथावरील मोठे चेंबर पावसामुळे खचले असून, तेथे मोठा खड्डा पडला आहे. या पदपथावरून विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांची वर्दळ असते. चुकून लक्ष न गेल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. यासाठी तातडीने पदपथावरील ड्रेनेजची दुरुस्ती करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

मगरपट्टा रस्ता अगोदरच आरुंद आहे. त्यातच पदपथाची दुरवस्था असल्यामुळे नागरिकांना चालणेही अवघड झाले आहे. पदपथावर अतिक्रमण व त्यातच दुरवस्था मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. पालिकेने या प्रश्नात लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news