भोरचा पश्चिम पट्टा अवकाळी पावसाने झोडपला

भोरला अवकाळी पावसाने झोडपले.
भोरला अवकाळी पावसाने झोडपले.
Published on
Updated on

भोर; पुढारी वृत्तसेवा: भोर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्याला शुक्रवारी (दि. 2) सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान अवकाळी पावसाने झोडपले असून, ओढ्या-नाल्यांना पाणी वाढले आहे. जोरदार पावसामुळे शेतात काम करणार्‍या शेतकर्‍यांचे मोठे हाल झाले.

तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील वीसगाव व चाळीसगाव खोरे परिसरात शुक्रवारी (दि. 2) दुपारपासून ढगाळ हवामान तयार होऊन सायंकाळी पाचच्या दरम्यान ढगांचा गडगडाट तसेच विजेच्या कडकडाटांसह पाऊस अर्धा तास जोरदार बरसला.

या पावसाने ओढ्या-नाल्यांच्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून, भातखाचरांतही पाणी साचले आहे. पावसामुळे भात पीक जोमात येणार असले, तरी कडधान्य पीक वाया जाण्याची भीती शेतकर्‍यांना आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news