भोर : निरा-देवघर धरण शंभर टक्के

भोर : निरा-देवघर धरण शंभर टक्के
Published on
Updated on

भोर : भोर तालुक्यातील निरा-देवघर धरण शनिवारी (दि. 13) दुपारी 12 वाजता 100 टक्के भरले. धरणाच्या पाच दरवाजांतून 8250 क्युसेकने, तर वीजनिर्मिती केंद्रातून 750 क्युसेकने असे नऊ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती निरा-देवघरचे उपविभागीय अभियंता अनिल नलावडे यांनी दिली. पुणे जिल्ह्यातील भोर, सातारा जिल्ह्यातील फलटण, खंडाळा, सोलापूरमधील माळशिरस आदी दुष्काळी तालुक्यांसाठी हे धरण वरदायिनी आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारी (दि. 13) दुपारी 12 वाजता धरणातील पाच दरवाजांतून पाणी सोडायला सुरुवात झाली. धरणावर शाखाधिकारी श. सी. किवडे, मोजणीदार दत्तात्रय कापरे, चौकीदार संतोष कंक, सुनील रेणुसे, संतोष डोईफोडे, निवृत्ती रेणुसे, किसन चंदनशिव यांच्या हस्ते पूजन झाले. 11.91 टीएमसी क्षमता असलेल्या निरा-देवघर धरणावरील वीजनिर्मिती केंद्र शनिवारपासून सुरू करण्यात आले असून, त्यासाठी 750 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. वीजनिर्मिती केंद्रातून दररोज 6 मेगावॅट वीजनिर्मिती सुरू झाली आहे. धरणाचा बॅकवाटर 25 किमी आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news