भारती विद्यापीठामागे साचले तळे; नालेसफाईचे काम न झाल्याचा परिणाम

भारती विद्यापीठामागे साचले तळे; नालेसफाईचे काम न झाल्याचा परिणाम

धनकवडी : पुढारी वृत्तसेवा: परिसरातील अनेक ठिकाणी पावसाळीपूर्व नालेसफाईची कामे पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे धनकवडी परिसरातील भारती विद्यापीठाकडे जाणार्‍या भारती विहार सोसायटीसमोरील रस्त्यावर शनिवारी सायंकाळी गुडघाभर पाणी साठले होते.
भारती विद्यापीठाच्या मागील गेट समोरील वळण उतारावरील रस्त्यावरून दुचाकीस्वार, पादचार्‍यांना मार्गस्थ होताना मोठी तारांबळ उडाल्याचे दिसून आले. परिसरातील सांडपाणीवाहिनी तुंबल्याने रस्त्यावर पाणी साचले होते.

काही वेळानंतर पाऊस कमी झाला आणि येथील साचलेल्या पाण्याचाही हळूहळू निचरा झाला. मात्र, पुन्हा मोठा पाऊस झाल्यास या ठिकाणी पुन्हा पाणी साठण्याची शक्यता आहे. पावसाळापूर्व नालेसफाई या ठिकाणी केली नसल्याने या ठिकाणी माती व कचरा साठल्याने पाणी साठल्याची परिस्थिती उद्भवली आहे. तसेच भारतीय विद्यापीठ मागील गेटच्या भारतीय विहार सोसायटी आणि समोरील अतिक्रमणावर कारवाई झाली, मात्र कारवाई केलेल्या इमारती शेड पक्के बांधकाम कारवाई केल्यानंतर पडलेला राडाराडा तसाच पडून आहे.

त्यामुळे हा राडाराडा ड्रेनेजमध्ये अडकून ते तुंबल्याचे दिसते. त्यामुळे हा राडारोडा उचलावा, अशी मागणी होत आहे. या भागामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वास्तव्यास असून, अनेक शिक्षण संकुल या भागात असल्याने या ठिकाणी दिवस-रात्र वर्दळ असते. या परिसरातून रस्त्यावरून अनेक वाहने वाहत असून, या ठिकाणी अपघात घडण्याची ही शक्यता असल्याने लवकरात लवकर नालेसफाई करून पाणी साठू नये, अशी उपाययोजना करण्याची मागणी आता नागरिकांकडून होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news